भाजपाला मोठे यश, अंतीम निकाल उशिरापर्यंत येण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : देशात भाजपा आघाडीला लोकसभा निवडणूकीत प्रचंड यश मिळाले आहेत. भाजपने दिलेला ३०० पार चा नारा खरा ठरत असून ३५०   जागांवर भाजपा विजय मिळविण्याच्या उंबरठ्यावर आहे. देशातील अनेक लोकसभा क्षेत्रांचा निकाल येणे बाकी असून उद्यापर्यंत अंतीम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. काही लोकसभा क्षेत्रांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. केवळ अधिकृत घोषणा झालेली नाही.  
अनेक राज्यांमध्ये काॅंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. राज्यातही केवळ एका जागेवर काॅंग्रेस आघाडीवर आहे. राज्यात भाजपा २३ , शिवसेना १८ , राष्ट्रवादी काॅंग्रेस ४, एमआयएम १ आणि अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. 
देशात काॅंग्रेसप्रणीत युपीए केवळ ९४  जागांवर आघाडीवर आहे. अन्य पक्षांचे ९९ उमेदवार आघाडीवर आहेत तर भाजपप्रणीत एनडीए ३४९ जागांवर आघाडीवर आहे. देशभरात भाजपामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहे. तसेच राहूल गांधी यांनीही पराभव स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेशातूनही अभिनंदन केले जात आहे.

   Print


News - World | Posted : 2019-05-23


Related Photos