शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याकडून पत्रकाराला मारहाण


वृत्तसंस्था /  अलिबाग :  निवडणूक मतमोजणी प्रक्रिये दरम्यान  शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याकडून अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण झाल्याची घटना घडली.
अलिबाग येथे रायगड लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत नाही तोवर मतदान केंद्राबाहेर आमदार जयंत पाटील यांनी प्रथम पोलिसांसोबत हुज्जत घातली. कशाळकर हे आपले वृत्तांकनाचे काम करून आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते, त्या दरम्यान मतमोजणी केंद्रात आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मतमोजणी केंद्रावर आले. 
आमदार जयंत पाटील हे कशाळकर यांना म्हणाले तुम्ही पत्रकार काहीही बातम्या छापता तर चांगल्या बातम्या पण छापा आम्ही आता निवडून आलो असे संभाषण करीत थेट कशाळकर यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या कानशिलात वाजवली. तर आमदार पंडित पाटील व बलमा यांनी कशाळकर यांच्या कॉलरला हात घालत धक्काबुक्की केली.  



  Print






News - Rajy | Posted : 2019-05-23






Related Photos