महत्वाच्या बातम्या

 समाजात एकता निर्माण करण्याचे पर्व म्हणजे रक्षाबंधन : प्रा. डॉ.भारत पांडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : समाजातील विषमता, जातीयता, प्रादेशिक, वांशिक भाषिक भेद न पाहता केवळ रक्षा बंधन द्वारे समाजात एकता निर्माण करता येते असे  मत प्रा. डॉ. भारत पांडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग, लोकसंख्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवा वस्ती व शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह येते रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाद्वारे केले. या रक्षा बंधनाच्या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना समाजाच्या जवळ नेऊन समाजातील समस्या, समाजातील विषमता आणि  शासकीय योजना याच्या परिचय वावा म्हणून खास समाजशास्त्र विभागाद्वारे सेवा वस्तीमध्ये विशेष प्रकारे रक्षा बंधनाच्या कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी सेवा वस्तीतील लोकांची हितगुज करून त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या त्यांच्याशी जिवाड्याशी बोलून आम्ही देखील तुमच्या लहान मूल आहो आणि म्हणून कोणताही परिचय नसताना सहजपणे विद्यार्थ्यांच्या मनात समाजाविषयी आपुलकी प्रेम निर्माण करण्याचे कार्य या रक्षा बंधनात कार्यक्रमांद्वारे करण्यात आले.महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भारत पांडे यांनी विद्यार्थ्यांनी समाजाकडे जावे समाजाशी एकरूप व्हावे याकरिता विविध उपक्रम राबवत असतात त्याच्या अनुषंगाने सेवा वस्ती व आदिवासी शासकीय मुलांचे वस्तीगृह येथे देखील रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाद्वारे जे घरापासून दूर राहतात अशा विद्यार्थ्यांना राखी बांधून घराचे आठवणी जी येते ती दूर करण्याच्या प्रयत्न देखील केला याद्वारे विद्यार्थ्यांनी देखील मनोगत करताना म्हटले की आज पर्यंत कोणीही आमच्या वसतिगृह वर राखी बांधण्यासाठी आले नाही परंतु महाविद्यालयातील विद्यार्थिनी आम्हाला राखी बांधले त्यामुळे आजपासून आम्ही देखील यांच्याशी ताई म्हणून व्यवहार करू आणि घरापासून दूर राहूनही आमची जी देखभाल केली त्यासाठी आम्ही महाविद्यालयाचे ऋणी आहो असे स्पष्ट मत आदिवासी शासकीय मुलांचे वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना मानले हा रक्षाबंधन कार्यक्रम प्राचार्य डॉ.संजय फुलझले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग तथा लोकसंख्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला होता.  हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. शाम कोरडे, प्रा. डॉ. रवी शास्त्रकार प्रा.रवी गजभिये, प्रा. ज्योती बोभाटे प्रा. सालू कर व अन्य विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos