मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते रतन सिंग यांचा मतमोजणीच्या वेळीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


वृत्तसंस्था / सिहोर  : लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यापासूनच भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपने २०१४ पेक्षाही मोठ्या फरकाने जागांवर विजयी होण्याचे कल हाती येऊ लागले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते रतन सिंग यांचा मतमोजणीच्या वेळीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
रतन सिंग हे मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष होते. मतमोजणीच्या वेळी निवडणुकांचे काय कल आहेत? याबाबत माहिती घेत असताना रतन सिंग यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी याबाबत तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनाही सांगितले. पण तेवढ्यातच ते कोसळले. काँग्रेस या जागेवर लढत असून तेथे काँग्रेस खूपच पिछाडीवर आहे. येथे काँग्रेसकडून दिग्विजय सिंग हे रिंगणात आहेत, तर भाजपने साध्वी प्रज्ञा सिंग यांना रिंगणात उतरवले आहे. मतमोजणीचे कल पाहता दुपारी २ वाजेपर्यंत साध्वी प्रज्ञा सिंग या दिग्विजय सिंग यांच्यापेक्षा समाधाकारक आघाडीवर होत्या.  Print


News - World | Posted : 2019-05-23


Related Photos