आतापर्यंत ११ लाख ३७ हजार २९६ पैकी ६ लाख २५ हजार ७८८ मतांची मोजणी पूर्ण


- लवकरच येणार निकाली हाती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या मतांची मोजणी सुरू असून दुपारी 2 वाजतापर्यंत सहाही विधानसभा क्षेत्रातील झालेल्या 11 लाख 37 हजार 296 पैकी 6 लाख 25 हजार 788 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. 
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील 15 लाख 80 हजार 70 मतदारांपैकी 11 लाख 37 हजार 296 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी 6 लाख 25  हजार 788  मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. 
आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपाचे अशोक नेते यांना 2 लाख 93 हजार 100, काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी यांना 2 लाख 65 हजार 73, वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार डाॅ. रमेशकुमार गजबे यांना 75 हजार 521, देवराव नन्नावरे यांना 6 हजार 786, बहूजन समाज पार्टीचे उमेदवार हरीश्चंद्र मंगाम यांना 12 हजार 98 मते मिळाली आहेत. तर नोटा ला 11 हजार 710 मते पडली आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-23


Related Photos