महत्वाच्या बातम्या

 भाभा अणूसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची आत्महत्या : राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीष सोमनाथ शर्मा असे मृत शास्त्रज्ञांचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.

माहितीनुसार, ५० वर्षीय मनीष शर्मा यांनी सोमवारी दुपारी ३ च्या दरम्यान आत्महत्या केली. पत्नीने शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीने मनीष शर्मा यांना BARC रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले ? याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.
ट्रॉम्बे येथील BARC मधील ५० वर्षीय शास्त्रज्ञाने सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली. मयताचे नाव मनीष सोमनाथ शर्मा ५० वर्ष असून तो आपल्या पत्नी नीतू मनीष शर्मा ४८ वर्ष सोबत राहत होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी सोमवारी दुपारी ३ च्या दरम्यान आत्महत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साह्याने पंख्याला लटकून गळफास घेतला. पत्नीने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने ॲम्बुलन्सने बीआरसी हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शर्मा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ट्रॉम्बे पोलिसांनी या प्रकरणात ADR दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos