तेलगू देसम पार्टी पराभवाच्या छायेत , आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राजीनामा देणार


वृत्तसंस्था / अमरावती : बिगर भाजप सरकारसाठी विविध विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना विधानसभा निवडणूकीत जबरदस्त धक्का बसला आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीत जगनमोहन रेड्डी यांच्या  वायएसआर काँग्रेस पक्षाने १४९ जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे तेलगू देसम पार्टीची सत्ता जातेय हे लक्षात आल्यानंतर आता चंद्राबाबू नायडू हे संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार आहेत.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी पक्षाला २५ जागांवर आघाडीवर आहे तर वायएसआर काँग्रेस १४९ जागांवर आघाडीवर आहे. तर जनसेना पार्टीला फक्त एकाच जागेवर आघाडी मिळवता आली आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-23


Related Photos