महत्वाच्या बातम्या

 सत्यशोधक समाज या माहितीपटाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : जोतिबा आपला आभाळा एवढा महात्मा फुले विचार, वारसा, परंपरा आणि आजच्या काळातील प्रासंगिकता. 

उपस्थित लोक अडीच तास लक्ष एकवटुन ऐकत होती. हॉल भरगच्च होता. तरुणाई मोठ्या संख्येने होती. जुनून फिल्म्स निर्मित सत्यशोधक समाज या माहितीपटाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम. २०२२ हे वर्ष सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष. १५० वर्षांनंतरही सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले कशाप्रकारे प्रासंगिक आहेत, हे या माहितीपटातून दाखवण्यात आले आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. हरी नरके आणि गुमाडी विठ्ठल राव गदर यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर माहितीपट दाखविण्यात आला.

याप्रसंगी सिने अभिनेते किरण माने, इतिहास अभ्यासक सरफराज अहमद आणि पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी विचार मांडले. सगळेच वक्ते खूप समयोचित बोलले. आजच्या काळातील प्रश्नांसंदर्भात त्यांनी उदबोधक विचार मांडले. अध्यक्ष बाबा आढाव यांनी तडफदार भाषण करत तरुणांची मने जिंकली.

अडीच तास कसे गेले कोणालाच कळले नाही इतकी ही चर्चा रंगली होती. याचा व्हिडिओ लवकरच युट्यूबवर उपलब्ध असेल. त्याशिवाय फिल्मसुद्धा जूनून फिल्म्स च्या चॅनेलवर पाहता येणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos