महत्वाच्या बातम्या

 देशात खेळ अनिवार्य केला पाहिजे : आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नायडू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : २९ ऑगस्ट २०२३ रोजी मेजर ध्यानचंद यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्य आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्य चंद्रपूर येथील खत्री महाविद्यालयात क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. त्यात चंद्रपूरचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार व आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते राजेश नायडू यांच्या सत्कार प्राचार्य डॉ जे.एम. काकडे यांच्या हस्ते करण्यात आला व उपस्थीत विद्यार्थीयांसाठी त्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.

मेजर ध्यानचंद यांनी आपल्या मंत्रमुग्ध क्रीडा क्षमतेने देशाला ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्णपदके मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची कीर्ती फुटबॉल चे पेले आणि क्रिकेटच्या ब्रॅडमनसारखी झाली होती, ज्यामुळे भारताचे नाव जगभर उजळले होते. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ सन २०१२ पासून त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्य आयोजित क्रीडा दिन कार्यक्रमात खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.एम. काकडे यांनी चंद्रपूरचा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नायडू यांचा मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर राजेश नायडू यांनी उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधित करताना खेळाशी निगडित राहण्याचे फायदे सांगितले. राजेश नायडू म्हणाले की, कोणत्याही स्तरावर खेळल्याने शरीर निरोगी राहते, वाईट सवयी लागत नाहीत आणि जीवनातील वाईट प्रसंगांशी लढण्याची ताकद मिळते. आपल्या देशात दोन गोष्टी अनिवार्य झाल्या पाहिजेत, एक मतदान आणि दुसरी खेळ खेळणे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याशिवाय अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित केले. महाविद्यालयाचे डॉ. रवि वाळके यांच्या उपस्थितीत क्रीडा विभाग प्रमुख आशिष चहारे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर मराठी विभाग प्रमुख डॉ. मुरमाडे यांनी आभार व्यक्त केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos