महत्वाच्या बातम्या

 समुद्राला ५ दिवस उधाण : पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : येत्या ३० ऑगस्टपासून पुढील सलग पाच दिवस समुद्रात मोठी भरती असणार आहे. यावेळी ४.५४ ते ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. भरतीच्या वेळी समुद्रकिनारी अथवा चौपाटीवर फेरफटका मारताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

जून ते सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्र खवळलेला राहतो. या काळात समुद्राला मोठी भरती असल्यास उंच लाटा उसळतात. यावर्षी जूनमध्ये पाच, तर जुलैमध्ये सहा दिवस समुद्राला मोठी भरती होती. ऑगस्टमध्ये आठ दिवस मोठी भरती होती. यात ३० ते ३१ ऑगस्टचाही समावेश आहे. सप्टेंबरमध्ये सहा दिवस मोठी भरती आहे. मध्यरात्रीही भरती येणार असल्यामुळे सहा दिवसात किमान दहा वेळा भरती येणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

मोठी भरती असल्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, समुद्राच्या पाण्यात उतरू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. भरतीचे स्वरूप लक्षात घेता गिरगाव, दादर, माहीम, खार, जुहू, सात बंगला, वेसावे, मार्वे, मढ येथील जीवरक्षकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos