महत्वाच्या बातम्या

 आत्मनिर्भर निर्भर अभियान अंतर्गत कृषी पायाभूत निधी योजना


- AIF लाभार्थी जोडणी अभियान पंधरवाडा : १६ ते ३१ ऑगस्ट २०२३ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : २५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट/कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी पायाभूत निधी योजना AIF लाभार्थी जोडणी अभियान पंधरवडा निमित्त सावतेली सभागृह, तालुका चामोर्शी जि. गडचिरोली येथे दुपारी ११:०० वाजता कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा. रमेश बारसागडे, माजी कृषी सभापती जि.प.गडचिरोली यांनी कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, व स्वतः व गावाच्या विकासासाठी उपयोग करावा असे आवाहान केले. सर्व शेतकऱ्यांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करावे हे सांगितले.

कार्यक्रमाचे उद्धघाटक म्हणून लाभलेले युवराज टेभुर्णे, जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, गडचिरोली यांनी केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी अग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेमधील विविध व्यवसाय सुरू करून लाभ घेण्याविषयी आव्हान केले. तसेच शेतकऱ्यांना बँक लोन पद्धत व त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी व शंका निरसन केले व काही कारणास्तव शेतकऱ्यांचे बँक प्रकरणे जिल्ह्यातील कुठल्याही बँक शाखेमध्ये प्रलंबित असल्यास त्याची माहिती जिल्हा अग्रणी कार्यालय यांना देण्याचे सूचित केले, व यापुढे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे कुठलेही कर्ज प्रकरण प्रलंबित राहणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी श्रीमती. अर्चना राऊत- कोचरे यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मुल्यसाखळी वाढविण्यासंबंधी राइस मिल ग्रेडिंग, पॅकिंग, पीठ गिरणी, मसाला प्रक्रिया उद्योग, दालमिल, गोडाऊन, पाक हाऊस शेडिंग नेट वापरुन भाजीपाला उत्पादन शितगृह मका पासून पशुखाद्य, कोबडी, मस्या खाद्य उत्पादन यासारखे उदयोग उभेरणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. यांनी कृषी पायाभूत निधी योजनेचे प्रमुख लाभार्थी सोबतच इच्छुक लाभार्थी, कृषी उद्योजक, कृषि पदवीधर कंपनीचे संचालक गटाचे अध्यक्ष यांना यामध्ये Post Harvest Componant काढणी पश्चात घटक उभारण्यासाठी लागणाऱ्या कर्जासाठी व त्या कर्जाची (CGTMSE -Nabkisan) हमी घेण्यासाठी सोबतच 3%टक्के व्याज सवलत मिळवण्यासाठी आणि इतर योजनेची सांगड घालून अनुदान (Subsidy) मिळण्याची संधी प्राप्त करण्यासाठी, AIF योजने विषयी संपूर्ण माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संकेत भोयर, जिल्हा संसाधन सल्लागार, गडचिरोली यांनी उद्योजकता विकासीत करून जिल्हाधिकारी कार्यालाकडून या साठी वेळोवेळी शेतकर्यांना मदत केली जाईल असे सांगितले.

वाळवी, मंडळ कृषी अधिकारी, चामोर्शी यांनी कृषि विभागाच्या सर्व योजना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, कृषि अभियांत्रिकी योजन कृषि औजारे बँक, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना;

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (pmfme) फलबाग लागवड, या विषयी मार्गदर्शन केले . यावेळी सचिन गोटे (अर्थशास्त्र तथा वित्त सल्लागार) व जगदीश जिरीत्कर,(सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चामोर्शी) हे उपस्थित होते. तलासगेडाम, कृषी पर्यवेक्षक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर श्रीमती. कोयताडे, कृषी सहाय्यक यांनी आभार प्रदर्शन केले. सोबत कृषी विभागामधील सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, सदस्य, गटाचे अध्यक्ष वैयक्तिक शेतकरी व महिला शेतकरी, तसेच कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते. असे नोडल अधिकारी, जिल्हा अंमल बजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प, प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos