महत्वाच्या बातम्या

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शासनाच्यावतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत आंबा कलमे व रोपे, आंबा कलमे (सधन लागवड), पेरु कलमे, पेरु कलमे (सधन लागवड) डाळिंब कलमे, कागदी लिंबु कलमे व रोपे, संत्रा, मोसंबी कलमे, संत्रा कलमे (इंडो इस्त्राईल पध्दत) सिताफळ कलमे, आवळा कलमे, चिंच कलमे व रोपे, जांभुळ कलमे व रोपे, फणस कलमे व रोपे, अंजीर कलमे, चिकु कलमे या फळपिकाचा समावेश आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत अदा केलेल्या परवान्यावर शासकीय रोपवाटीकेवरुन कलम रोपांची उचल केल्यानंतर लागवड करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यास ३ वर्षाच्या कालावधीत ५० टक्के, ३० टक्के, व २० टक्के प्रमाणे तीन टप्प्यात अनुदान देय राहील. लाभार्थ्यांने लावलेली फळझाडे पहिल्या वर्षी किमान ८० टक्के व दुसऱ्या वर्षी ९० टक्के जगविणे आवश्यक राहील.

इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरुन महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल आणि आपल्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. सदर प्रक्रिया शेतकऱ्यांना एकदाच करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos