महत्वाच्या बातम्या

 लक्षीत घटकांच्या व्यक्तींना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : निवडणूक आयोगाने संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या घटकातील व्यक्ती, कचरा गोळा करणारे व्यक्ती व विमुक्त जमातीच्या लक्षीत घटकांच्या व्यक्तींनी नमुना ६ भरुन मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या घटकातील व्यक्ती, कचरा गोळा करणाऱ्या व्यक्ती व विमुक्त जमातीच्या लक्षीत घटकातील व्यक्तींचे ज्या ठिकाणी निवासस्थान आहे. त्या ठिकाणच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे भेट देऊन नमुना ६ भरुन मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावे.

जे नवमतदार जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोंबर महिन्याच्या १ तारखेला किंवा त्यापुर्वी १८ वर्षाचे होणार आहे, अशा नवमतदारांनी नमुना ६ भरुन मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी. ज्या मतदारांना केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जाणे शक्य नसल्यास त्यांनी संबंधित सर्व प्रकारच्या अर्जासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline App Play Store वरुन डाऊनलोड करुन मतदार यादीत नाव समाविष्ठ करुन घ्यावे किंवा तसे शक्य न झाल्यास तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागास भेट देऊन मतदार यादीत नाव समाविष्ठ करुन घ्यावे, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos