पिक अप वाहनाचा टायर फुटल्याने अपघात, १ ठार, ८ जखमी


- विरूर जवळील घटना
प्रतिनिधी / विरूर (स्टे.) :
राजुरा तालुक्यातील विरूर येथे आठवडी बाजारासाठी भाजीपाला घेवून जात असलेल्या पिक अप वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. यापैकी २ जण गंभीर जखमी आहेत.
उषा कैलास रामेटेके (४०) रा. बल्लारपूर असे मृसे मृतक महिलेचे नाव आहे. या अपघातात वाहनचालक प्रशांत गायकवाड यांच्यासह ८ जण जखमी आहेत. सदर घटना आज २२ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. 
प्राप्त माहितीनुसार एमएच ३४ एबी ६७८१ क्रमांकाचे पिक अप वाहन विरूर येथील आठवडी बाजारासाठी बल्लारपूर येथून भाजीपाला घेवून जात होते. वाहनात १६ जण बसले होते. दरम्यान नवेगाव फाट्याजवळ एका वळणावर वाहनाचा टायर फुटला. यामुळे वाहन पलटले. या अपघातातील जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच विरूरचे ठाणेदार कृष्णकुमार तिवारी, पोलिस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पठाण, सुदर्शन काळे, गेडाम यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तत्काळ राजुरा ग्रामीण रूग्णालयात हलविले. जखमींची नावे कळू शकले नाही.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-22


Related Photos