आमदार वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे शेतकरी अपघात विम्याची रक्कम खात्यात जमा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / सावली :
  शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २ लाख रुपये वारसांना देण्याचे  शासकीय परिपत्रक असताना वर्षोनवर्षे ही प्रकरणे प्रलंबित असतात. मात्र ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ मदत मिळवून दिली आहे. 
सावली तालुक्यातील १३ शेतकऱ्यांच्या वारसांनी मागील २ वर्षांपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मिळावा,  याकरिता प्रस्ताव दाखल केले. या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू साप चावणे, वीज पडणे, पुरात वाहून जाणे, रस्ते अपघात, बुडून मृत्यू, प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू अशा प्रकारे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना २ लाख रुपये शासनाने नेमलेल्या विमा कम्पनिकडून ६ महिन्याच्या  आत देण्याची तरतूद आहे. परंतु सदर विमा कंपनीकडून विमा देण्यास विलंब केल्या जातो. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा सावली पंचायत समिती गटनेते विजय कोरेवार यांनी केला व या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या  लक्षात आणून दिले. आमदारांनी १५ दिवसापूर्वी सदर लाभार्थी महिलांना घेऊन नागपूर येथील विमा कंपनीचे कार्यालय गाठून धारेवर धरले. त्यावेळी लवकरात लवकर विमा रक्कम देण्याचे कंपनीने आश्वासन दिले होते. त्यानंतर शुभांगी रविंद्र कोसमशिले, चंद्रकला जना मेश्राम, संगीता संदीप गडपल्लीवार, जीवनकला केशव मोहूर्ले, उर्मिला सुधीर चापडे या लाभार्थ्यांना विमा रक्कम मिळाली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-22


Related Photos