महत्वाच्या बातम्या

 पर्यावरणाकडे चला  : प्रा. डॉ. भारत पांडे      


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : एकीकडे आपण चंद्रावर पोहोचत आहोत तेथील पाण्याचा शोध घेऊन मानव जातीच्या उद्धाराकरिता प्रयत्न करणार आहोत परंतु आपल्या पृथ्वीतलावर असणारा जो पानी, पर्यावरण आहे, झाडे आहेत याकडे मात्र आपलं दुर्लक्ष आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरण पूरक मानवी साखळी निर्माण करून रक्षाबंधन साजरा करण्यात आला या पर्यावरण पूरक रक्षाबंधनाद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरणाकडे चला असा मौलिक संदेश प्रा. डॉ. भारत पांडे समाजशास्त्र विभागप्रमुख यांनी दिले. 

या वेळेला भारतीय समाज हा उत्सव प्रिय असून प्रत्येक उत्सवामागे विशेष उद्देश असतो. त्याचबरोबर आधुनिक काळात पर्यावरणाला राखी बांधून पर्यावरण वाचवावे आणि या भारत मातेला सुजलाम, सुफलाम करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर येणाऱ्या राखीला आपण जाहिरातीद्वारे कॅडबरी चॉकलेटच्या सेलिब्रेशन न करता आपल्या भावासाठी, आपल्या मामासाठी घरी बनवलेला चिवडा चकली रवा लाडू शिरा ही गोड वस्तू भेट देऊन आपला राखी तेव्हार साजरा करावा असेही मनोगत प्राचार्य डॉ. संजय फुलझले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. 

यावेळेला पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरा करण्याकरिता प्रा.डॉ. गणेश खुणे, प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. रवी गजभिये, प्रा. श्याम कोरडे, प्रा. सालुलकर, प्रा. गबने, प्रा. ज्योती बोबाटे व संपूर्ण महाविद्यालयातील युवक आणि युवती सहभागी होऊन पर्यावरण पूरक राखी साजरी करण्याकरता सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos