तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू


- अहेरी तालुक्यातील आलदंडी येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महिलेचा विज कोसळून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आलदंडी येथे आज २२  मे रोजी सकाळी घडली आहे.
बेबी चैनु आत्राम (३४) असे मृतक महिलेचे नाव आहे. बेबी आत्राम ही आज तेंदुपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेली होती. दरम्यान विजांचा कडकडाट सुरू झाला व अचानक विज कोसळली. यामध्ये ती जागीच गतप्राण झाली. तिच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
सध्या तेंदुपत्ता हंगाम सुरू असल्यामुळे नागरीक पहाटेपासूनच जंगलात तेंदुपाने गोळा करण्यासाठी जात आहेत. मात्र नागरीकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या वातावरणात बदल झाला असून वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट होत आहे. यामुळे नागरीकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-22


Related Photos