वादळाचा कहर , चिंचेचे झाड चारचाकी वाहनावर कोसळले, जिवितहाणी टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी/ कुरखेडा 
: वादळामुळे चिंचेचे झाड चारचाकी  वाहनावर कोसळल्याची घटना आज २१ मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावर गेवर्धानजीक घडली.सुदैवाने जिवीत हाणी टळली.मात्र कुरखेडा-देसाईगंज मार्ग बंद पडला आहे. 
आज सायंकाळच्या सुमारास वादळासह मुसळधार पावसास प्रारंभ झाला. आकाशात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटही सुरू झाला. अशातच गेवर्धा येथे मुख्य मार्गावर असलेले भलेमोठे चिंचेचे झाड कुरखेडा येथील टिकाराम नाकाडे यांच्या एमएच ३३ व्ही ०१८७ या क्रमांकाच्या उभ्या चारचाकी वाहनावर कोसळले.यामध्ये जिवीत हाणी झाली नाही.मात्र वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. विद्युत पुरवठा बंद पडला. कुरखेडा-देसाईगंज मार्ग बंद पडला.
३३ केव्ही लाईनवर सुध्दा झाड पडल्याने कुरखेडा तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. वाहनचालकांना रस्त्यावर खोळंबून पडावे लागले. रस्त्यावर झाड पडल्याची माहीती मिळताच गेवर्धा येथील नागरीकांनी धाव घेऊन झाड तोडले व वाहतुक सुरळित करण्यास मदत केली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-21


Related Photos