चिंचाळा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / मारेगाव
: कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील चिंचाळा येथील एका वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज २१ मे रोजी घडली आहे. किसन नामा काकडे (७५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. 
तालुका  मुख्यालयापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या चिंचाळा येथील किसन  काकडे  यांनी  दुपारी दोन वाजता घरी कोणीही नसताना विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जिवणयात्रा संपविली. त्यांच्याकडे  चार एकर शेती आहे.  त्यांनी सेंट्रल बँकेकडून  ८५ हजाराचे कर्ज घेतले होते. दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जाची परतफेड होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्याच्या नातेवाईकाकडून  सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-05-21


Related Photos