नागपूर लोकसभा क्षेत्रातून विजय मिळविण्याच्या दाव्यावर पटोले - महाजन यांचे राजकारणातून निवृत्तीचे चॅलेंज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई : 
नागपुर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मी पाच लाख मतांनी पराभव करेन, असा दावा काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला आहे.  यावर पटोले यांना  भाजप नेते गिरीश महाजन यांनी  आव्हान दिलं. पाच लाख सोडा, गडकरींपेक्षा एक मतही जास्त घेऊन दाखवा, मी निवृत्ती घेईन जर गडकरी विजयी झाले तर तुम्ही निवृत्ती घ्या असे चॅलेंज महाजन यांनी दिले तर पटोले यांनीही महाजन यांचे चॅलेंज स्वीकारले असून आता नागपूरच्या लढतीत अधिक रंजकता आली आहे. 
टीव्ही ९  मराठी या वृत्तवाहिनीवर  बोलताना गिरीश महाजन आणि नाना पटोले आमने - सामने होते. यावेळी दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं. गडकरींना यावेळी पाच लाख मतांनी हरवणार असं विश्वासाने पटोलेंनी सांगितलं. गिरीश महाजनांनी पटोलेंना आव्हान देत, गडकरींपेक्षा एक मतही जास्त घेऊन दाखवा, असं उत्तर दिलं. नाना पटोले निवडून आले तर मी निवृत्ती घेईन आणि निवडून न आल्यास त्यांनी निवृत्ती घ्यावी, असं आव्हान महाजनांनी दिलं. पटोलेंनीही हे आव्हान स्वीकारलं. विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं खातं उघडणंही कठीण असल्याचं गिरीश महाजन म्हणाले.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-21


Related Photos