गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचा निकाल लागणार सर्वात आधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गुरुवार २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे सर्वानाच निकालाची उत्सुकता लागली आहे. एकूणच २३ मे रोजी देशातील सर्व जागांची स्थिती दुपारी ४ वाजतापर्यँत स्पष्ट होणार आहे. मात्र गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचा निकाल सर्वात आधी लागू शकतो. 
गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी केवळ ५ उमेदवार रिंगणात होते. मात्र काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारात अटीतटीची लढत होणार आहे. निवडणूक विभागाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे.   गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी  सकाळी ८ वाजतापासून कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय ८४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी  ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी कृषी महाविद्यालयातील दोन मजल्यांचा वापर करण्यात येणार आहे. जवळपास प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीच्या २५ फेऱ्या  अपेक्षित आहेत. कमीतकमी वेळेत मतमोजणीच्या फेऱ्या व्हाव्यात, यासाठी पोस्टल व बायलेट मतमोजणीसाठी स्वतंत्र कर्मचारी राहणार आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-21


Related Photos