गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निकालावर लागलाय लाखोंचा सट्टा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
लोकसभा निवडणूकीचा निकाल अवघ्या  एका दिवसावर येवून ठेपला आहे. अशातच केवळ पाच उमेदवार रिंगणात असलेल्या गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात काॅंग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. यामुळे या क्षेत्रात सटोडीयांनी लाखोंचा सट्टा लावला आहे. 
१९ मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी, संस्थांनी आपले एक्झीट पोल जाहीर केले. यामध्ये भाजपा आघाडीला स्पष्ट बहूमत दाखविले गेले आहे. या एक्झीट पोलनंतर सट्टा बाजाराला तेजी आली आहे. अनेक जण आपआपले अंदाज वर्तवून हजार रूपयांपासून लाखो रूपयांपर्यंत सट्टा लावत आहेत. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपाचे वर्चस्व असले तरी या निवडणूकीत काॅंग्रेस बाजी मारेल, असे बोलल्या जात आहे. मात्र भाजपाचा उमेदवार विजयी होईल तरी जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता कमीच आहे. सध्या तरी दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढ होण्याची चिन्हे आहेत. 
लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपाचे आमदार आहेत. यामुळे सट्टा लावणार्यांनी भाजपाकडे झुकता माप दिला असल्याचे बोलल्या जात आहे. असे असले तरी काॅंग्रेस वरचढ ठरणार की, भाजपा पुन्हा बाजी मारणार हे आता २३ मे रोजी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-21


Related Photos