कोलकातामध्ये 'त्या ' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यात घेण्यात आलेले मतदान १९  मे रोजी संपले. मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील २०० क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. २२ मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्यादिवशी फेरमतदान घेण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 
२२ मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या आधी तसेच मतदानाच्या दिवशी मोठा हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी अशा वादग्रस्त मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याविषयी गोयल यांची निवडणूक आयोगासोबत बैठक झाली. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाण प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केल्याचं गोयल यांनी म्हटलं होतं.   Print


News - World | Posted : 2019-05-21


Related Photos