ब्रम्हपुरीत सर्वाधिक ४५. ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 विदर्भात उष्णतेची लाट कायमच असून  आज  ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक  ४५. ९ अंश सेल्सिअस  तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या दोन दिवसांत पारा ४६ अंश पार करेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ब्रह्मपुरी पाठोपाठ चंद्रपूर ४५.८  अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. 
 विदर्भात आज अकोला ४४.६ , अमरावती ४३, बुलडाणा ४२,  गडचिरोली ४४.३ , गोंदिया ४३.५ , नागपूर ४४.२ , वर्धा ४५, वाशिम ४३, यवतमाळ ४३.५ अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद करण्यात आली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-21


Related Photos