महत्वाच्या बातम्या

 १ लाख ३० हजारांची लाच घेतांना बीडीओ सह तिघे जण एसिबीचा जाळ्यात 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : तेंडू पानांची वाहतूक करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका तेंदुक कंत्राटदाराकडून एक लाख तीस हजार रुपयांची लाख स्वीकारताना लाच प्रतिबंध विभागाचा अधिकाऱ्यांनी अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रतीक दिवाकर चन्नावार, संजीव येल्ला कोठारी व अनिल बुधाजी गोवर्धन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील प्रतीक चन्नावार हा प्रभारी गटविकास अधिकारी असून संजीव कोठारी हा कंत्राटी पेसा समन्वयक तर अनिल गोवर्धन हा खाजगी व्यक्ती आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता कंत्राटदाराने गोविंदगाव येथील तेंडू पानांचे युनिट लीलाद्वारे खरेदी केले होते. या तेंडू पानांचे वाहतूक करण्याकरिता पंचायत समितीकडून नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक्षा नावावर व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी कंत्राटदारास एक लाख तीस हजार रुपयांची लाच मागितली.

परंतु लाल देण्याची मुळीच इच्छा असल्याने तक्रार करताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाचा अधिकाऱ्यांनी लाच सापळा रसला असता अनिल गोवर्धन यांच्या माध्यमातून तक्रारकर्त्याकडून एक लाख तीस हजार रुपयांची लाच पंचाशक्षम सक्षम स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार आहेत.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणिकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, हवालदार दत्त तोटे, राजेश पद्मगीरवार किशोर जोंजारकर, संदीप उडान, संदीप घोरमोडे, प्रफुल डोर्लीकर यांनी ही कारवाई केली आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos