वासी जवळ वऱ्हाड्यांचे ट्रॅक्टर पलटले, आठ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
लग्नाचे  वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले असून यात दोन जण गंभीर जखमी आहेत.  जखमी मध्ये दोन महिलांचा समावेश आहे.  ही घटना आज २० मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वासी गावाजवळील वळणावर घडली
 तालुक्यातील भगवानपूर येथील काटेंगे परिवारातील लग्नकार्य कार्य आटोपून गट्टेपायली(चातगाव)ता. धानोरा येथे काही वऱ्हाडी ट्रॅक्टरने परत जात असताना  वासी गावाजवळ आज सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली पालतल्याने हा अपघात झाला 
 जखमीमध्ये ,धानु आतला (४८) ,मधुकर मडावी (७५) ,वासुदेव बोगा (३८) ,सोमा दुगा (४३) ,नानु बोगा (३७) ,चेंडू हलामी (५५) सर्व राहणार गट्टेपल्ली .  तर याच ट्रॅक्टर मध्ये कढोली येथील आठवडी बाजार करून  वासी येथे परत जाणाऱ्या सुरेखा पुराम (३०) व यशोदा पुराम (४०) या दोन महिलांचाही जखमी मध्ये समावेश आहे.  या सर्व जखमींना १०८ रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . घटनेची माहिती मिळताच परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल ,भाजपचे जिल्हा सचिव विलास गावंडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-20


Related Photos