नंदोरी येथे २१ रोजी देहदान संकल्प दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नंदोरी :
स्मृतीशेष श्री रा.गो. उपाख्य भाऊसाहेब ऊकेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त २१ मे रोजी  देहदान संकल्प दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून नुकत्याच पार पडलेल्या संकल्प सभेत  जीते जी रक्तदान व मरणोपरांत  नेत्रदान ,देहदान या घोषवाक्याला प्रथम आचरणात आणण्याचे आवाहन श्री मिलिंदजी  दीक्षित यांनी केले. या संकल्प सभेत महेशजी कहारे, सौ.मिनल कहारे, सौ.दिपाली दीक्षित, सौ.सिंधुताई वानखेडे , किशोरजी ऊकेकर, प्रवीण राडे ,डॉक्टर गुजर,  दुर्गाप्रसादजी यादव, अरविंदजी दहापुते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी देहदानाचा संकल्प केला व देहदाना  बाबत जनजागृती करून लोकचळवळीच्या माध्यमाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे दृष्टीने स्मृतीशेष रा .गो. ऊकेकर यांनी केलेल्या देहदानाच्या प्रत्यक्ष उदाहरणातून सर्वांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे असे मत डॉक्टर गुजर यांनी मांडले. २१ मे २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक नागरिकांनी किशोरजी ऊकेकर यांचे निवासस्थानी ,सुरभी टायपिंग  इन्स्टिट्यूटच्या मागे ,नंदोरी  रोड, येथे उपस्थित राहून देहदानाचा  संकल्प करावा असे आवाहन अरविंदजी दहापुते व महेशजी कहारे यांनी केले आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2019-05-20


Related Photos