भाजपा १७ व्या लोकसभा निवडणूकीच्या निकालातही गाठणार २५० हून अधिकचा आकडा


- विदर्भ न्यूज एक्सप्रेस ने घेतला विविध राज्यांतील जागांचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
१७ व्या लोकसभा निवडणूकीसाठी आज अंतीम टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता २३ मे रोजी होत असलेल्या निकालाकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. यामुळे विदर्भ न्यूज एक्सप्रेसने देशातील विविध राज्यांच्या एकूण जागांबाबत आढावा घेतला असता भारतीय जनता पक्षाला २५० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. 
विदर्भ न्यूज एक्सप्रेसने विविध राज्यातील पत्रकारांशी साधलेल्या संवादानुसार भाजपाला २५० ते २५५ , एनडीए ३८ ते ४० , भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस ८९ ते ८९, युपीए ४९ ते ५० आणि इतर पक्षांना ११५ पर्यंत जागा मिळू शकतात. 
२०१४ च्या निवडणूकीत भाजपचे २८२ उमेदवार विजयी झाले होते. या निवडणूकीत सर्वच पक्षांचा सुपडा साफ झाला होता. भाजपासोबत असलेल्या सर्व घटकपक्षांनी मिळून ३३६ जागा मिळविल्या होत्या. यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. घटकपक्षांपैकी शिवसेनेला १८ , तेलगु देसम पार्टी १६, एलजेपी ६, शिरोमणी अकाली दल ४, आरएलएसपी ३ , अपना दल २ आणि इतर ५ पक्षांनी प्रत्येकी एक जागा मिळविली होती. 
तर काॅंग्रेस प्रणीत युपीए ने ६० जागांवर समाधान मिळविले होते. यापैकी काॅंग्रेसला ४४ , राकाॅला ६, आरजेडी ४, जेएमएम २ आईयूएमएल २ आणि इतर दोन पक्षांनी प्रत्येकी एक जागा मिळविली होती. एनडीए आणि युपीए व्यतिरीक्त २०१४ मध्ये इतर पक्षांनी १४७ जागा मिळविल्या होत्या.
२०१९ च्या निवडणूकीत काॅंग्रेससह २१ पक्ष एकवटले आहेत. भाजपविरोधात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात महागठबंधन तयार केले आहे. असे असले तरी सोशल मिडीया आणि अन्य राज्यांतील राजकीय जाणकारांच्या मते भाजपाला २५० हून अधिक जागा मिळू शकतात. तसेच त्यांच्या घटकपक्षांना मिळालेल्या जागांच्या भरवशावर पुन्हा केंद्रात भाजपाची सत्ता येउ शकते, असा अंदाज आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या तसेच देशातील जनतेच्या नजरा २३ मे च्या निकालाकडे लागल्या आहेत. तसेच राजकीय समिकरणे जुळविण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

   Print


News - World | Posted : 2019-05-19


Related Photos