गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात काॅंग्रेस मारणार बाजी ! - विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे एक्झीट पोल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होणार आहेत. त्याआधी विदर्भ न्यूज एक्सप्रेसने लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा क्षेत्रातील पत्रकार, राजकीय पदाधिकारी तसेच मतदारांशी साधलेल्या संवादावरून आपले एक्झीट पोल जाहिर केले आहे. यामध्ये काॅंग्रेसच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे.  असे असले तरीही भाजप विजयी झाल्यास जास्त मतांचा फरक राहणार नसल्याचे दिसून येत आहे. 
२०१४ च्या निवडणूकीत भाजपाचे अशोक नेते प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले होते. यावेळीही काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी हेच होते. यावेळी काॅंग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केल्यामुळे ग्रामीण जनतेचा कल काॅंग्रेसकडे वळल्याचे दिसून येते.  गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपा सरकारची पाच वर्षातील कामगिरी पाहता मतदार साथ देणार अशी परिस्थिती नव्हती. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजानेही बहिष्काराची भूमिका घेतली होती. यामुळे बहूत्येक ओबीसी मतदारांनी नोटा चा पर्याय निवडला आहे. तसेच ग्रामीण भागातील मतदारांनी काॅंग्रेसलाच कौल दिल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील ग्रामसभांना काॅंग्रेसच्या काळात अनेक हक्क आणि अधिकार मिहाले. यामुळे ग्रामसभांचा सुध्दा काॅंग्रेसला पाठींबा होता. मागील पाच वर्षात बेरोजगारीसुध्दा या लोकसभा क्षेत्रात वाढल्याचे दिसून आले. एकही उद्योग उभा राहिला नाही.  याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे काॅंग्रेस विजयी होण्याची  शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरीही भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यास मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

- गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात स्थानिक पत्रकारांकडून घेतलेले अंदाज

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपा वरचढ राहणार

लोकसभा निवडणूकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी भाजपाला कौल दिल्याचे दिसून येते. गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यात भाजपा पुढे राहण्याची शक्यता आहे. तर धानोरा तालुक्यात काॅंग्रेसला मताधिक्य मिळू शकते.
रूपराज वाकोडे
जिल्हा प्रतिनिधी दै. भास्कर गडचिरोली

-----------------------------------------------------------

आरमोरी विधानसभा क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद

आरमोरी विधानसभा क्षेत्रात अनेक निवडणूकांमध्ये भाजपने अधिक मते घेतली आहेत. मात्र यावर्षी संमिश्र कौल असू शकतो. विद्यमान आमदारांची कामगिरी बघता आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने भाजपाला मते दिली. बुथ पातळीवर भाजपाचे नियोजन उत्तम राहिले आहे. या मानाने काॅंग्रेस बुथ पातळीवर कमी पडली. तरीही दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये अधिक फरक पडणार नाही, अशी स्थिती आहे.
जितेंद्र पारसवाणी
संपादक, देसाईगंज समाचार 

------------------------------------------------------------------------------

अहेरी विधानसभा क्षेत्रात काॅंग्रेस वरचढ राहणार

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांचा विचार केल्यास काॅंग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. अहेरी व आलापल्ली या अधिक मतदारसंख्या असलेल्या शहरात संमिश्र मतदान झाले.  सिरोंचा शहरातून काॅंग्रेस बाजी मारू शकते. मात्र ग्रामीण भागात भाजप आघाडी घेण्याची शक्यता आहे. एटापल्ली, मुलचेरा आणि भामरागड तालुक्यात दोन्ही पक्षांना संमिश्र कौल होता.
ओमप्रकाश चुनारकर
जिल्हा प्रतिनिधी डीडी न्यूज रा. आलापल्ली

-----------------------------------------------------------------------------

चिमूर विधानसभा क्षेत्रात वंचित बहूजन आघाडी वरचढ ठरणार

चिमूर विधानसभा क्षेत्रात वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार रमेशकुमार गजबे आघाडी घेण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार अशोक नेते हे दुसर्या स्थानी तर काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. नामदेव उसेंडी तिसर्या स्थानी राहू शकतात.
चुन्नीलाल कुडवे
तालुका प्रतिनिधी , दै. भास्कर चिमूर

----------------------------------------------------------------

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात संमिश्र कौल 

गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा क्षेत्रांपैकी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झाले आहे. यामुळे या लोकसभा क्षेत्रात भाजप आणि काॅंग्रेस या दोन्ही पक्षांना संमिश्र कौल असू शकतो. या विधानसभा क्षेत्रात वंचित बहूजन आघाडीला सुध्दा बर्यापैकी मते मिळण्याची शक्यता आहे.
प्रा. रवि रणदिवे, ब्रम्हपुरी  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos