नक्षल बंदमुळे दुर्गम भागातील बाजारपेठा बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
आज १९ मे रोजी नक्षल्यांनी बंद पुकारला आहे. यामुळे   कोरची, भामरागड शहर व या तालुक्यांमधील दुर्गम भागातील बाजारपेठा बंद आहेत. अनेक रस्त्यांवरही शुकशुकाट आहे. 
नक्षल दरम्यान पोलिसांनी सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी केला असून, अतिसंवेदनशील २५ पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  बंददरम्यान नक्षल्यांनी बॅनर बाजी सुरु केली आहे.  एटापल्ली व भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके टाकून रस्त्यांची अडवणूक केली. गुरुपल्लीजवळ काही ठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकण्यात आली. मात्र नागरिकांनी रस्ता सुरळीत केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  २७ एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा  यांना खोट्या चकमकीत ठार केल्याचा दावा करीत नक्षल्यांनी   बॅनर व पत्रकांमधून  आज  १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos