महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


- १९६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

- शिष्यवृत्तीत जि.प. शाळांच्या यशाचा चढता आलेख

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी तयार होण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे १९६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सहभागी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मागील वर्षी २ हजार ४२८ विद्यार्थी सहभागी झाले होते. तर यावर्षी जिल्हा परिषद शाळेच्या यशाच्या चढत्या आलेखात ३ हजार ८७५ एवढे विद्यार्थी सहभागी झाले, त्यापैकी १९६ विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले आहेत.

पाचवी आणि आठव्या वर्गात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पॅटर्न स्पर्धा परीक्षा सारखाच असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षेची माहिती व आवड निर्माण होण्यासाठी जिल्हा परिषदेने सेस फंडातून सहभागी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची रक्कम भरली. शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून परीक्षा पूर्व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेच्या सरावासाठी लागणारे ओएमआर शीट तसेच विविध प्रश्नपत्रिका शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने तयार करून घेतल्या. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले.

शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषदेला मिळालेले यश हे शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची सकारात्मक भूमिका आणि मार्गदर्शनात शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय यंत्रणा आणि शिक्षकांनी केलेल्या परिश्रमाची पावती आहे.

विद्यार्थ्यांनी भविष्यात करिअरच्या विविध संधी विषयक माहिती घेणे काळाची गरज आहे. स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीच्यादृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos