कुरखेडा, एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी वनविभागाचे लाकडी बिट जाळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज १९ मे रोजी पुकारलेल्या  बंददरम्यान  नक्षल्यांनी   पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी (चिपरी) तसेच एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली जवळ वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली.  तसेच एटापल्ली व भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके टाकून रस्त्यांची अडवणूक केली. गुरुपल्लीजवळ काही ठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकण्यात आली. मात्र नागरिकांनी रस्ता सुरळीत केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
२७ एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा  यांना खोट्या चकमकीत ठार केल्याचा दावा करीत नक्षल्यांनी    नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांमधून  आज  १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.  बंदच्या पार्श्वभूमीवर, नक्षल्यांनी  पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी(चिपरी) येथील जंगलात वनविभागाच्या लाकडी बिटांना आग लावली. तसेच एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली परिसरात जाळपोळ केली.   यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos