तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मेडीगड्डा-कालेश्वर प्रकल्पाला भेट देणार , सुरक्षा वाढविली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज  १९ मे रोजी सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील मेडीगड्डा-कालेश्वर प्रकल्पाला भेट देणार आहेत. 
सकाळी कालेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मेडीगड्डा प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.  गोदावरी नदीलगतच्या भागात माओवाद्यांच्या काही वर्षांपूर्वी असलेल्या कारवाया लक्षात घेता मेडीगड्डा प्रकल्पाच्या परिसरास गोदावरी नदीलगतच्या भागात तेलंगण पोलिसांसह हैदराबादहून आलेल्या ग्रे-हाउंडच्या विशेष जवानांनी या भागाची कसून पाहणी केली. जवानांनी सीमेच्या दोन्ही बाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-19


Related Photos