शनिवार ठरला 'हॉट डे' : महाराष्ट्रातील चंद्रपूर हे देशातील सगळ्यात उष्ण शहर असल्याची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
अंदमान निकोबारमध्ये अखेर मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी आनंदवार्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अंदमानात जरी मान्सून दाखल झाला असला तरी भारतात उष्णतेची  लाट कायम आहे. शुक्रवारी तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये ४० अंशापर्यंत तापमान पोहचलं होतं.
सगळ्यात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चंद्रपूर हे देशातील सगळ्यात उष्ण शहर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज चंद्रपूरमध्ये ४५. ८ अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरमीमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. संपूर्ण देशात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूरसह, ब्रम्हपूरीमध्ये  ४५. ६ , नागपूरमध्ये ४५. ४ आणि वर्धामध्ये ४४. ९ अंश सेल्शिअस तापमान आहे.  या राज्यांमध्ये उष्णतेचा तीव्र फटका बसत आहे. त्यामुळे उष्णाच्या चटक्यांमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील अकोल्यामध्ये उष्णाच्या झळा बसत आहेत. अकोल्यामध्ये ४३. ८ इतका उन्हाचा पारा चढला आहे. त्याचबरोबर देशातील तेलंगणा, कर्नाटक आणि झारखंडमध्येही तापमानात वाढ झाली आहे.

 

   Print


News - Rajy | Posted : 2019-05-18


Related Photos