महत्वाच्या बातम्या

 एटापल्ली येथे घनकचरा घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : आज २४ ऑगस्ट २०२३ रोजी नगरपंचायत एटापल्ली यांच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ नुसार घनकचरा घंटागाडी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. नगरपंचायतीचे नगराध्यक्षा दिपयंती निजान पेंदाम यांच्या हस्ते घंटागाडीचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी राघव सुलवावार बांधकाम सभापती न.पं. एटापल्ली, निजान पेंदाम नगरसेवक न.पं. एटापल्ली, राहुल कुळमेथे नगरसेवक न.पं. एटापल्ली, शिवाजी रसाळ प्रशासकीय अधिकारी न.पं. एटापल्ली तसेच नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि महिला माता भगिनी ग्रामस्थ उपस्तीत होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos