भारत शुक्र ग्रहावर यान पाठवण्याच्या मोहिमेसाठी सज्ज


वृत्तसंस्था / श्रीहरिकोटा :  मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी ‘मंगळयाना’च्या यशस्वी मोहिमेनंतर आता हिंदुस्थान शुक्राकडे झेप घेणार आहे. भारतीय अतंराळ संशोधन संस्था (इस्रो) आगामी १० वर्षात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. त्यातच शुक्र ग्रहापर्यंत पोहोचण्याच्या महत्त्वाच्या अंतराळ मोहिमेचाही समावेश आहे. या मोहिमेसाठी २०१३ हे वर्ष निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेत २० पेक्षा जास्त अंतराळ उपकरणे पाठवण्यात येणार आहेत. ‘युविका २०१९’ या कार्यक्रमात   विद्यार्थ्यांशी संवाद साधताना  इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी याबाबतची माहिती दिली. 
मंगळयान यशस्वीपणे पाठवल्यानंतर आता हिंदुस्थान अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. इस्रो अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करत आहे. त्यात शुक्र ग्रहावर यान पाठवण्याच्या महत्त्वाच्या मोहिमेचाही समावेश आहे. त्यासाठी २०२३ हे वर्ष निश्चित करण्यात आले आहे.  या प्रकल्पाला इतर देशांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे, असे सिवन यांनी सांगितले. हिंदुस्थानला अंतराळ महाशक्ती बनवण्याच्या हेतूने येत्या दशकात इस्रो अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पृथ्वी आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अनेक बाबतीत सारखेच आहेत. दोघांचा आकार, निर्माणाची स्थिती, घनता, गुरुत्वाकर्षण यामध्ये साम्य आहे. त्यामुळे पृथ्वी आणि शुक्राला एकमेकांचे जुळे ग्रह म्हणून ओळखले जातात. शुक्राच्या भूपृष्ठाची आणि कक्षेची माहिती मिळवण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. त्याचबरोबर शुक्रावरील वातावरण, रासायनीक प्रक्रिया, सौर रेडिएशन आणि हवेचाही अभ्यास करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर काम सुरू झाले असून इस्रोतील संशोधक या मोहिमेसाठी खूप उत्साहित आहेत. ही आमची महत्त्वाकांक्षी मोहीम असून त्यासाठी जगभरातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. या मोहिमेत २० पेक्षा जास्त अंतराळ उपकरणे पाठवण्यात येणार असल्याचे सिवन यांनी सांगितले.   Print


News - World | Posted : 2019-05-18


Related Photos