लाचखोर महिला क्रीडा अधिकारी हॉस्पिटलमध्ये


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / नागपूर : 
अनुदान मंजूर केल्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताच महिला क्रीडा अधिकारी त्रिवेणी नत्थू बांते (वय ४९ रा.भवानी टॉवर, भंडारा) यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर सक्करदऱ्यातील गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
गुरुवारी सायंकाळी एसीबीच्या पथकाने पाच हजारांची लाच घेताना त्यांना मानकापूरमधील विभागीय क्रीडा संकुलमध्ये रंगेहात पकडले होते. सूचनापत्र देऊन त्यांना शुक्रवारी सकाळी सिव्हिल लाइन्समधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. शुक्रवारी त्या कार्यालयात हजर झाल्या नाहीत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांना गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांना समजले. अधिकाऱ्यांनी येथील डॉक्टरांची भेट घेतली. रक्तदाब वाढल्याने त्यांना दाखल करण्यात आल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. बांते यांना सुटी होताच पुढील कारवाईसाठी एसीबीचे पथक त्यांना ताब्यात घेतील, अशी माहिती आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-05-18


Related Photos