वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
वाडी नगर परिषदेत काम करणाऱ्या एका खासगी संस्थेच्या तीन अभियंत्याचे वेतन काढून देण्यासाठी २४  हजारांची लाच मागून त्यापैकी २० हजारे रुपये स्वीकारताना वाडी भाजप   नेते आणि नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे  आज १७ मे रोजी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.   या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वाडी नगर परिषदेत पुरवठादार संस्थेने  तीन स्थापत्य अभियंत्याचा पुरवठा केला होता. त्यांचे चार महिन्यांचे वेतन काढून देण्यासाठी संस्थेच्या संचालकाकडे झाडे यांनी २४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. संस्थेने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १६ मे रोजी तक्रार दिली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  रचलेल्या सापळ्यानुसार, संस्थाचालक आणि झाडे यांच्यात २० हजार रुपये लाच देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार झाडे यांच्याकडे आज सकाळी १० वाजता पोहचले. त्यांच्याकडून झाडे यांनी लाचेची रक्कम स्विकारताच बाजुलाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झाडेंना रंगेहात पकडले. कारवाईनंतर झाडे यांना लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील कार्यालयात आणण्यात आले.  त्यांची कसून चौकशी केली जात आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-17


Related Photos