गेमिंग पार्टनर आवडला, पबजी खेळणाऱ्या महिलेने पतीकडून मागितला घटस्फोट


वृत्तसंस्था /  अहमदाबाद :   पबजी गेम खेळताना गेमिंग पार्टनर आवडल्यामुळे  एका महिलेनं चक्क  पतीकडून घटस्फोट मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  एका मुलाची आई असलेल्या  महिलेने  हेल्पलाईनशी संपर्क साधून मदतदेखील मागितली आहे. सध्या ही महिला पतीचं घरी सोडून माहेरी राहत असल्याचे कळते. 
  पबजीमधला पार्टनर आवडल्यानं घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी मदत करा, असा फोन महिला हेल्पलाइनमध्ये (१८१) काम करत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला आला. फोन करणारी महिला एका प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्याची माहिती अधिकारी महिलेनं दिली. कौटुंबिक वादामुळे नव्हे, तर पबजीमधील पार्टनरसोबत राहण्याची इच्छा असल्यानं घटस्फोट हवा असल्याचं महिलेनं हेल्पलाईनला सांगितलं.
'फोन करणाऱ्या महिलेचं वय १९ वर्षे आहे. गेल्याच वर्षी तिचा विवाह एका बांधकाम कंत्राटदारासोबत झाला. तिला एक मूलदेखील आहे. काही महिन्यांपूर्वी तिला पबजीचं व्यसन जडलं. ती सतत पबजी खेळू लागली. यादरम्यान तिची एका तरुणाशी ओळख झाली. तो तरुण नियमितपणे पबजी खेळायचा,' असं हेल्पलाईन कक्षात काम करणाऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं. 'पतीशी कोणताही वाद होत नाही, असं त्या महिलेनं सांगितलं. तिला केवळ पबजीमुळे संपर्कात आलेल्या त्या तरुणासोबत राहायचं आहे. त्यासाठी ती पतीचं घर सोडून माहेरी आली आहे. या महिलेचं कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात आहे,' अशी माहिती हेल्पलाईनमध्ये समुपदेशकांकडून  देण्यात आली आहे.   Print


News - World | Posted : 2019-05-17


Related Photos