महत्वाच्या बातम्या

 हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील विवेकानंद वॉर्डातील एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी मंगळवारी सासरकडील पती, सासू व नणंद या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पती राहुल ईश्वर हेडाऊ वय २९ वर्ष, सासू सुमन ईश्वर हेडाऊ वय ५५ वर्ष रा. बल्लारपूर, व नणंद मोनाली कमलेश तळोधीकर रा. चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.

पीडित महिलेचा १५ एप्रिल २०२२ रोजी विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांत हुंड्याचे १२ लाख रुपये माहेरून आण, असा तगादा सासरच्यांनी लावला. पीडितेच्या भावाने ४ लाख ४७ हजार रुपये बँकेमार्फत आणि २ लाख ५० हजार रुपये रोख असे ६ लाख रुपये दिले. तरीही, सासरच्या मंडळीकडून तिचा सारखा छळ सुरू असल्याने अखेर तिने बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध ३०७, ४९८ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे पुढील तपास करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos