जांभुळखेडाच्या घटनेबद्दल नक्षल्यांनी पत्रकातून व्यक्त केली प्रतिक्रिया


- घटनेत सहभागी नक्षल कॅडरचे केले अभिनंदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
१  मे रोजी महाराष्ट्र  दिनी नक्षल्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून १५  जवानांचा बळी घेतला होता. या घटनेबद्दल नक्षल्यांनी प्रथमच पत्रक काढून प्रतिक्रीया दिली आहे. पत्रकातून घटनेत सभागी नक्षल कॅडरचे अभिनंदन केले आहे. तसेच येत्या १९  मे रोजी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.
भामरागड - आरेवाडा मार्गावर नक्षल्यांनी पत्रके टाकली आहेत. यामध्ये नक्षल्यांनी जांभुळखेडा घटनेला पोलिसांचे नक्षलविरोधी सुरू असलेले अभियान कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. या पत्रकात मागील वर्षी २२ एप्रिलला झालेल्या कसनासूर - तुमिरगुंडा चकमकीचा उल्लेख केला आहे. तसेच नुकतेच २७ एप्रिल रोजी ठार करण्यात आलेल्या नक्षल कमांडर रामको आणि शिल्पा या दोघींना पोलिसांनी पकडून खोटी चकमक दाखवून ठार केल्याचे म्हटले आहे. या पत्रकातून पोलिस विभाग तसेच सरकारविरूध्द मजकूर लिहिण्यात आला आहे. १९  मे रोजी जिल्हा बंद चे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रूग्णालये आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळण्यात याव्या, असेही आवाहन नक्षल्यांनी केले आहे. पोलिस विभाग या सर्व नक्षल घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. ३० एप्रिल पासून अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली.   नागरिकांची हत्या करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी बॅनर , पत्रके टाकून विकासकामे बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. नक्षली अनेक घातपाताच्या कारवाया घडवून आणत असल्यामुळे पोलिसांनी सतर्क राहून नक्षलविरोधी अभियान सुरू ठेवले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-17


Related Photos