नागपूर येथील महिला क्रीडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
युवक कल्याण योजना प्रशिक्षण राबविण्याबाबतचे प्रस्ताव मंजूर करून रक्कम जमा केल्याचा मोबदला म्हणून ५ हजारांची लाच स्वीकारणारी महिला क्रीडा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे.
 त्रिवेणी नत्थुजी बांते  (३९) विभागीय क्रिडा अधिकारी कार्यालय , मानकापूर नागपूर  असे अटक करण्यात आलेल्या क्रीडा अधिकाऱ्याचे नाव आहे.   
तक्रारकर्ती न्यू मानकापूर कोराडी रोड नागपूर येथील रहीवासी असुन महेंद्र बहुउद्देशिय शिक्षण  शिक्षण संस्था , परसोडी, पारशिवणी या संस्थेच्या सचिव या पदावर आहे. सदर संस्था निमशासकीय असल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालय नागपूर या कार्यालयात संस्थेची नोंदणी केली आहे. सन २०१८ - २०१९ या वार्षीक वर्षात युवक कल्याण योजना प्रशिक्षण राबविण्याकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी, नागपूर यांच्याकडे प्रस्ताव मंजूरी करीता सादर केला होता. संस्थेद्वारे प्राप्त प्रस्ताव क्रीडा अधिकारी त्रिवेणी नथ्युजी बांते हीने मंजूर केला व संस्थेच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम २५ हजार रूपये जमा करण्यात आली. सदर जमा करण्यात आलेल्या अनुदानाच्या रक्कमेच्या आदेशाची प्रत संस्थेच्या ऑडिट करिता आवश्यक असल्याने सदर आदेशाची प्रत घेण्याकरिता तक्रारकर्तीने  क्रिडा अधिकारी त्रिवेणी नथ्युजी बांते हिला भेटली .  तिने तक्रारकर्तीस संस्थेव्दारे प्राप्त प्रस्ताव मंजूर केला व रक्कम संस्थेच्या खात्यात जमा केली म्हणून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ५ हजार  रूपये लाचेची मागणी केली.  याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविण्यात आली. दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान  त्रिवेणी नत्थुजी बांते हिने तक्रारकर्तीस  ५ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारली. त्यावरून महिला आरोपी विरूध्द काल १६ मे रोजी  रोजी पोलीस ठाणे मानकापूर नागपूर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  
सदर कार्यवाही  पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक  श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार,  यांच्या मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक राजेश पुरी, नापोशि लक्ष्मण परतेती,  सुशिल यादव, मनापोशि गिता चौधरी , सफौ. परशुराम शाही यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-17


Related Photos