महत्वाच्या बातम्या

 ११ सप्टेंबरपासून विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेचा दुसरा टप्पा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात व मनपा कार्यक्षेत्रात विशेष मिशन इंद्रधनुष मोहीमेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे आयोजन ७ ते १२ आगस्ट या कालावधीत करण्यात आले. तर दुसरा टप्पा ११ ते १६ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

मोहीमेत लसीकरणापासू वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे (पाच वर्षाच्या आतील) व गरोदर माता यांचा शोध घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहीमेत लसीकरणाच्या सर्व लसींबरोबरच गोवर, रुबेला, पीसीव्ही, आयपीव्ही लस देण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या मोहीमेतील लसीकरणाची नोंद यु विन ॲपमध्ये करण्यात येणार आहे. मोहीमेचा तिसरा टप्पा ९ ते १४ आक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

लसीकरणापासून वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरण या मोहीमेत करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos