एटापल्ली - गुरूपल्ली दरम्यान नक्षल्यांनी ठिकठिकाणी बांधले बॅनर


- १९ मे रोजी जिल्हा बंदचे केले आवाहन
- महिला नक्षली रामको आणि शिल्पा चा खोट्या चकमकीत खात्मा केल्याचा आरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील ३१ एप्रिलपासून नक्षल्यांनी जिल्ह्यात हैदोस माजविला असून ठिकठिकाणी जाळपोळ, हत्या, स्फोट घडवून आणले जात आहेत. अशातच नक्षल्यांनी आता एटापल्ली तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर बांधून, नक्षली पत्रके टाकून १९ मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. 
एटापल्ली - गुरूपल्ली दरम्यान नक्षल्यांनी अनेक ठिकाणी बॅनर बांधले आहेत. हिंदी, मराठी आणि माडीया भाषेत पत्रके टाकण्यात आली आहेत. प्रथमच मराठी पत्रके आढळून आल्याने हे कृत्य शहरी नक्षल्यांचे असावे, अशी चर्चा परिसरात आहे. पत्रकांमधून महिला नक्षली रामको नरोटे आणि शिल्पा दुर्वा यांना सी - ६० पथकाच्या जवानांनी खोटी चकमक दाखवून ठार केले असल्याचे म्हटले आहे. रामको आणि शिल्पा यांना अटक करून जंगलात नेवून ठार मारण्यात आले, असेही नक्षल्यांनी म्हटले आहे. याबद्दल सी - ६० ने खंडण करावे, असे नमुद केले आहे. जांभिया येथील समाज मंदिर तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या फलकाला नक्षली बॅनर बांधण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी बॅनर बांधून सरकार आणि पोलिसांचा विरोध केला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-16


Related Photos