महत्वाच्या बातम्या

 बडोदा विद्यापीठात होणार सनातन साहित्याचा अभ्यास : १६० विद्यार्थ्यांनी केली नोंदणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / गुजरात : गुजरातच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात आता लवकरच सनातन साहित्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम लागू करणारे हे देशातले पहिले विद्यापीठ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. वैदिक काळानंतर उपनिषदांवरील ग्रंथांविषयी या अभ्यासक्रमात शिकवले जाणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या आराखड्यानुसार हा वेगळा मूल्यवर्धित अभ्यासक्रम म्हणून कलाशाखेच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासात समाविष्ट करण्यात आला आहे. १६० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा पर्याय स्वीकारला असून त्याचे वर्गही सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, १९५० च्या दशकात हाच विभाग त्याच्या शेक्सपियर सोसायटी या उपक्रमासाठी ओळखला जात होता. शेक्सपियरच्या नाटकांचे सादरीकरण या विभागातर्फे केले जायचे, त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळायचा. आता त्याच विभागात सनातन जीवनमार्गाचे धडे दिले जाणार आहेत. अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात उपनिषदांवर आधारलेल्या गोष्टींचा समावेश असणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यावर भगवद्गीता आणि इतर धार्मिक पुस्तकांचा समावेश असेल.

सध्या सनातन साहित्याविषयी त्याभोवती सुरू असलेल्या राजकीय वादंगामुळे कुणीही बोलण्याच्या भानगडीत पडत नाही. पण, आमच्यासाठी सनातन साहित्य हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण, त्यात कालातीत असलेल्या हिंदुस्थानच्या लिखित आणि मौखिक साहित्यकृतींचा समावेश आहे, अशी माहिती इंग्रजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक हितेश रवईया यांनी दिली आहे.





  Print






News - World




Related Photos