महत्वाच्या बातम्या

 महात्मा गांधी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे तीन दिवसीय उदबोधन वर्गाचा प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा याच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात ग्रंथालय विभागाद्वारे तीन दिवसीय उदबोधन वर्गाचा प्रारंभ २१ ऑगस्ट २०२३ ला करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, कला शाखा प्रमुख डॉ नोमेश मेश्राम, IQAC समन्वयक डॉ. सतीश कोला, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. जयेश पापडकर, प्रमुख मार्गदर्शक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ किशोर वासुर्के तथा ग्रंथालय समिती सदस्य डॉ विजय रैवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

मानवी जीवनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयाला अनन्यसाधारण महत्व आहे. जुन्या ग्रंथसहवासाच्या पद्धती नवीन आधुनिक युगात बदलल्या असल्यातरी वाचनाचे महत्व कमी न होता अधिकच वाढत गेले आहे. विद्यार्थ्यांना आवड असली तरी प्रत्यक्ष ग्रंथ विकत घेऊन ती पूर्ण करता येत नाही, म्हणून महाविद्यालयाने विध्यार्थ्यांना हवे तेव्हा व हव्या त्या ठिकाणी ग्रंथालय सेवा सवलतीचा मोफत वापर करता यावा म्हणून नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन सुविधा व मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचे ग्रंथालयाशी नातं घट्ट होऊन ते चिरकाळ टिकाव.  या सोयीचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेऊन आपले जीवन उन्नत व समृद्ध करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. लालसिंग खालसा यांनी केले.  

यानंतर प्रमुख मार्गदर्शक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. किशोर वासुर्के यांनी तीन दिवसीय उदबोधन वर्गाच्या वेळापत्रकानुसार सत्र २०२३ - २४ करीत नवे प्रवेशित बी.ए. भाग १ च्या विद्यार्थ्यांचे उदबोधन सत्र घेतले त्यामध्ये त्यांनी ग्रंथालयाच्या नियम व अटींची ओळख करून देऊन ग्रंथालय वापराच्या आधुनिक ऑनलाईन तथा ऑफलाईन पद्धतीचा परिचय करून दिला. यामध्ये OPAC / MOPAC  च्या मदतीने NList , DELNET, NDL, Shodhganga, e -Shodhsindhu, Shodhgangotri, Google Book, DOAJ, DOAB, I - Scholar या सारख्या असंख्य माहिती स्त्रोतांची ओळख करून देऊन त्याच्या वापराबाबत आणि त्याच्या मदतीने माहितीची गरज कशी पूर्ण करता येईल याचे प्रत्यक्ष सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर केले. 

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा डॉ विजय रैवतकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय कर्मचारी अनुज घोसे प्रा. वर्षा गवळी,  प्रा. दिलीप घोनमोडे यांनी प्रयत्न केले बी.ए. भाग १ च्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आजचा उदबोधन वर्ग उदघाटन सोहळा यशस्वी केला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos