जम्मू - कश्मीरच्या पुलवामा भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद


वृत्तसंस्था / पुलवामा  : येथील दलीपोरा येथे  सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.  या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. चकमकीमुळे  संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
प्राप्त  माहितीनुसार, पुलवाम्यातील दलीपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त टीमला मिळाली. यानंतर आज पहाटे जवानांनी या भागाला घेरले. जवानांनी शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.  अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या रविवारी काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली होती. त्या वेळी दोन दहशतवादी ठार झाले होते. हे दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.    Print


News - World | Posted : 2019-05-16


Related Photos