अल्पवयील मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा कारावास


- चंद्रपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधिश अन्सांरी यांचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर
: पाणी पिण्याचा बहाणा करून घरी एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्या आरोपीस चंद्रपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधिश क्रमांक २ अन्सारी यांनी १०  वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
कवडू मधुकर आत्राम (२५)  रा. राजुरा असे आरोपीचे नाव आहे. १५  जुलै २०१६  रोजी आरोपी कवडू मधुकर आत्राम याने अल्पवयीन फिर्यादी मुलगी घरी एकटीच असताना पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत राजुरा पोलिस ठाण्यात कलम ४५०, ३७६ (१), ३७६ (२)  भादंवि सहकलम ४ पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार यांनी पूर्ण करून आरोपी विरूध्द सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले.
१४ मे रोजी न्यायालयात साक्षीदार तपासून योग्य पुराव्याच्या आधारे आरोपीस कलम ४५०  भादंवि मध्ये ५ वर्षे शिक्षा व ५ हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास ४ महिने सश्रम कारावास, कलम ३७६ (१)(२) आय व कलम ४ पोस्को अंतर्गत १०  वर्षे शिक्षा व १०  हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार तर्फे ॲड. महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून नायक पोलिस शिपाई सुखदेव मेश्राम यांनी काम बघितले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-16


Related Photos