गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच ने मूल्यांकन केंद्रावरच्या समस्यांची विद्यापीठाला घ्यायला लावली दखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
उन्हाळी २०१९  च्या वार्षिक परीक्षा आटोपल्या असून सध्या  विद्यापीठाच्या गडचिरोली केंद्रावर मूल्यांकन कार्य जोमाने सुरू आहे.
पण मूल्यांकन करीत असताना परीक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. यामुळे मूल्यांकन केंद्रावरच्या समस्यांबाबत  गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचने  तातडीने विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ  भुसारी यांची भेट घेतली आणि   समस्यांचा पाढा वाचला. यामुळे  विद्यापीठाला समस्यांची  दखल घ्यावी लागली आहे. 
मूल्यांकन केंद्रावर पिणाच्या पाण्याचा अभाव, सर्वत्र अस्वछता, तुंबलेलं स्वछतागृह, उन्हा पासून बचाव करण्यासाठी साध्या  कूलर ची पण नसलेली सुविधा,इ बाबत जेव्हा प्राध्यापकांच्या अनौपचारिक तक्रारी प्राप्त झाल्या तेव्हाच शिक्षण मंचाची यंत्रणा कामी लागली.  गोंडवाना विद्यापीठ शिक्षणमंचाचे  अध्यक्ष प्राचार्य डॉ अरुणाप्रकाश , सचिव डॉ रुपेंद्रकुमार गौर यांनी तातडीने विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ  भुसारी यांची भेट घेतली   समस्यांचा पाढा वाचला.
उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ भुसारी यांनी शिरस्त्याप्रमाणे बघू,करू असे   विद्यापीठीय धोरण न अवलंबवता  युद्धस्तरावर सर्व समस्या सोडवण्यासाठी जातीने लक्ष घालून संचालक-परीक्षा व मूल्यमापन मंडळ, डॉ अ झो चिताडे यांना निर्देश दिले.  सदर बैठक संपायच्या आधीच सर्व प्रश्न सोडविणास सुरुवात देखील झाली आणि कूलर ची व्यवस्था देखील अचारसंहितेची अडचण असताना सुध्दा ताबडतोब करून देण्यात आली. या बाबत डॉ भुसारी यांचे आभार मानले. परीक्षकांच्या वतीने डॉ आर आर तुला, डॉ ललित उजडे,  यांनी गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचाचे अभिनंदन केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-16


Related Photos