पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारानंतर प्रचार कालावधी २४ तासांनी घटविला , निकाल लागेपर्यंत सर्वच पक्षांना प्रचार बंदी


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  बंगालमध्ये परवाऐवजी उद्या रात्री दहानंतर ते लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही पक्षाला प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.  निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी २४ तासांनी  घटवण्यात आला आहे. 
निवडणूक आयोगाने बुधवारी मोठा निर्णय घेत मुख्य सचिव राजीव कुमार यांना हटवले आहे. त्यांची गृहमंत्रालामध्ये रवानगी करण्यात आली आहे. तसेच उद्या गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून कोणत्याही पक्षाच्या जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो घेता होणार नाही. हॉटेलवरील दारूविक्रीवरही बंदी लादण्यात आली असून सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्यावरही निर्बंध लादले आहेत. निवडणूक आयोगाने कलम ३२४ चा वापर करून ही कारवाई केली आहे.
मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये मोठा गोंधळ झाला होता. तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.    Print


News - World | Posted : 2019-05-15


Related Photos